Weather Forecast Today : विदर्भावर पुन्हा गारपीटीचं संकट! येत्या २ ते ३ दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Vidarbha Weather Forecast Today : राज्यात पुढील 5 दिवस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त वर्तवला आहे. या सर्वाधिक फटका विदर्भाला बसणार असून विदर्भातील काही भागांत गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वीजा लखलखताना शक्यतो बाहेरची कामे टाळा किंवा योग्य निवारा बघा असे आवाहन करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

विदर्भात पुन्हा गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातत विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या २ ते ३ दिवसांत तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विदर्भात पुढील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाचे सावट असून 27 एप्रिल पर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे विदर्भातील तापमानात 5 ते 6 घसरण होईल अशी शक्यता आहे.

यामुळे 42 अंशावर गेलेले तापमान 35 अंशापर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

राज्यात काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वारा आणि विजांमुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या आणि जीवतहानीच्या घटना समोर आल्या. दरम्यान आता विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply