Weather Forecast : विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Weather Forecast : मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा बसत आहेत. काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद

यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, बुलढाणा ४०.०, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

Beed News : मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

मराठवाड्यात उन्हाच्या झळा कायम

मराठवाड्यालाही उन्हाच्या चांगल्याच झळा बसल्या. शनिवारी परभणीत ४३.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६, बीडमध्ये ४३.१ अंश तापमान होते. तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४३.४, सांगली ४१.६, सातारा ४०.९, जळगावात ४२.३ आणि मालेगावात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारपासून पुन्हा पावसाची शक्यता

दरम्यान, एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे सोमवारपासून (६ मे) विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईत कसं असेल हवामान?

मुंबईतील कमाल तापमानाचा पारा आणखी वाढतच आहे. पहाटे हवेत गारवा जाणवत असला तरी, दुपारनंतर उन्हाचे चटके बसत आहेत. सोमवारीही मुंबईतील वातावरणात उष्णता कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तापमानात वाढ झाल्याने मुंबईसह उपनगरात उष्णतेची लाट येऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply