Weather Forecast : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल; आज 'या' भागात कोसळणार पाऊस

Weather Forecast: वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. काही ठिकाणी उन्हाचा कडाका वाढला आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. परिणामी १३ मार्चपर्यंत अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Pune News : वडिलांवरचा आरोप लेकीनं खोडून काढला; आमित शाहांना धन्यावाद म्हणत सुप्रिया सुळेंनी सडेतोड उत्तर दिलं!

पश्चिम हिमालयीन प्रदेशावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या १० मार्चपासून डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ११ मार्चपासून राजधानी दिल्लीत तापमानात वाढ होईल, असंही हवामानात खात्याकडून सांगण्यात आलंय.

IMD नुसार, सध्याच्या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पूर्वेकडील हालचालीमुळे, पुढील २ दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही भागातही पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास, राज्यातील हवामानात गेल्या १५ दिवसांत वेगाने बदल झाल्याचे दिसून आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील किमान तापमानात मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा राज्यातील तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. सध्या अनेक भागात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply