Water Storage in Pune Dam : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Water Storage in Pune Dam : ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच पाणीटंचाईचं संकट दूर होण्याची शक्यता आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू. यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.

पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा (Khadakwasla) करणाऱ्या धरण साखळीमध्ये 30 मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Mihir Shah Arrested : मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, आईलाही घेतलं ताब्यात

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील (Pune) पाणी कपाटाची टांगती तलवार लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह परिसराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच या चारही धरणांमध्ये एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे ४ धरणांमधील पाणीसाठा ४.९९ टीएमसी झाला होता. त्यानंतर आता पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे.

पुण्यातील ४ धरणातील असलेला पाणीसाठा (टक्केवारी)

खडकवासला : ५४.२९ टक्के

पानशेत : ३१.८१ टक्के

वरसगाव : १८.९५ टक्के

टेमघर : १८.१३ टक्के

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply