Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; दुसरबीड ग्रामपंचायतीवर काढला हंडा मोर्चा

Water Shortage : पाणी टंचाईची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. यात पाणी टंचाईमुळे दुसरबीड येथील नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी पुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. 

बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. ठिकठिकाणी टँकर लावले जात असून काही गावात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे पाणी पुरवठा करणारे तलाव आटले आहेत. यामुळे गावातील पाणी पुरवठा  ठप्प झाला आहे. पाण्यासाठी महिलांना वन वन भटकावे लागत आहे. पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचातीकडे मागणी केली होती. असे असताना देखील येथे अद्याप उपाययोजना झाली नाही.   

Beed Lok Sabha : बीडमध्ये मविआ उमेदवाराकडून बोगस मतदानाची तक्रार; फेर मतदान घेण्याची मागणी

पाण्यासाठी मोर्चा काढत घोषणाबाजी 

गावात पाणी पुरवठा करण्याबाबत उपाययोजना करावी; अशी मागणी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान पाण्याचे टँकर मंजुरीसाठी ९ मे रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, पाणीपुरवठा होत नसल्याने गावातील संतप्त ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीवर् हंडा मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी केली. यावेळी पाणी द्या पाणी द्या,  जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो; अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply