Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; सरपंचासह सदस्यांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Water Shortage : यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे संकट  आतापासून निर्माण झाले असून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सुरेगाव रास्ते या गावात पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी सरपंचासह सदस्यांना ग्रामपंचायत कार्यलयात कोंडून ठेवले. 

नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहे. यात येवला तालूक्यातील सुरेगाव रास्ते या गावात ग्रामपंचायतीकडून महिन्यातून केवळ दोन वेळेस पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे गावात पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. तर संतप्त नागरिकांनी यावेळी ग्रामपंचायतमध्ये  सरपंचासह सदस्यांना कोंडत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.   

Dhule News : तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंद; वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा

एक दिवसाआड पाणी मिळावे 

ग्रामपंचायतीला पाण्यासाठी आलेल्या निधीतून पाणी पुरवठ्याची कामे न करता बिल काढण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने एक दिवसाआड पाणी द्यावे; अशी मागणी करण्यात आली अन्यथा ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply