Water Crisis : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला बांधले हंड्याचे तोरण; पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा


Yavatmal : जलजीवन मिशनचे काम अपूर्ण राहिल्याने गावात पाणी मिळत नाही. यामुळे गावकऱ्यांना पाण्याची समस्या उद्भवत आहे. यामुळे पाण्यासाठी संतप्त गावकरी महिलांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरीचे तोरण लटकून महिलांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. यामुळे जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.

यवतमाळ तालुक्यातील जामडोह या गावात जल जीवन मिशनचे काम रखडल्याने गावातील महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. बाराही महिने हीच परिस्थिती राहत असल्याने गावातील महिला संतप्त झाल्या आहेत. यामुळे गावकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घागरीचे तोरण लटकून पाणीटंचाई विरोधात महिलांनी आंदोलन केले.

Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी दिला भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट यवतमाळ तालुक्यातील जामडोह गावातील महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. या गावात जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम सुरु आहे. मात्र योजनेचे काम अर्धवट झाल्याचा आरोप यावेळी आंदोलन महिलांनी केला आहे. योजनेचे काम अर्धवट राहिल्याने गावात पुरेसे पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात हि भीषणता अधिक वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.

जिल्हा परिषद परिसरात घोषणाबाजी

गावात निर्माण होत असलेल्या पाण्याच्या समस्येला ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील पाणी समस्या सुटलेली नाही. यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ व महिलांनी पाणीटंचाई विरोधात आज जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply