Washim Accident : समृद्धीवर अपघात सत्र सुरूच! पुण्याहून वर्ध्याला जाताना कार अपघात, एकाचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Washim Accident : समृद्धी महामार्गावर अपघात सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर आज शनिवारी पुन्हा एकदा अपघात झाला आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यात अपघात झाला आहे. या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी आहेत. तर एक जण किरकोळ जखमी झाले आहे. 

Jitendra Awhad News : ठाकरेंच्या एन्ट्रीआधीच ठाण्यातील वातावरण तापलं; स्वागताला विरोध, जितेंद्र आव्हाड संतापले

अपघात कसा झाला?

समृद्धी महामार्गावरून पुणे-वर्धा येथे प्रवास करताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा टोल प्लाझाजवळ रस्ते अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात वेगाने येत असताना महामार्गावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे कार चालकाने अचानक गाडीचे ब्रेक मारले.

चालकाचं ब्रेक मारताना गाडीवर नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार दोन वेळा उलटली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

या अपघातात कौस्तुभ मुळे यांचा मृत्यू झाला आहे, तर अंकित गडकरी,कार्तिक निपोडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर संजय विलास गावंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर जखमी रुग्णांना तात्काळ समृद्धी महामार्ग द्वारा उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे दाखल करण्यात आले. दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply