Wardha News : अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Wardha News : अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारूबंदी असलेल्या  वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून देवळी  पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबेडकरनगर लेआउट परिसरात ही कारवाई केली आहे. 

पोलिसांना यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारू येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारवार पोलिसांनी देवळी येथील आंबेडकरनगर ले आऊट परिसरात छापा टाकला. यावेळी एक व्यक्ती कारमधून दारूसाठा घेऊन जात असताना आढळून आला. भीमजय नरेंद्र म्हैसकर (वय ४०) असे या इसमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने कळंब येथील बारमधून दारू आणल्याचे सांगितले. याप्रकरणी बार मालक मनीष जयस्वाल, कृष्णा जयस्वाल (दोन्ही रा. कळंब) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. 

Manoj Jarange Patil Regret : मनोज जरांगे यांनी व्यक्त केली दिलगिरी; देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले होते अपशब्द

यानंतर त्याच्या ताब्यातून कार तसेच दारूने भरलेल्या २५ खोक्यांतून १ हजार २०० बाटल्या असा ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयिताला देवळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, अभिजित गावंडे, संदीप गावंडे, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, शुभम बहादुरे यांनी केली. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply