Wardha News : ९ दुचाकींसह चाेरास अटक; वर्धा, नागपूर, चंद्रपूरातील गुन्हे उघडकीस

Wardha News : वर्धा शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू होता. यादरम्यान पोलीसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 

केळझर येथे एक जण त्याच्या ताब्यातील जुनी दुचाकी विक्री करण्यासाठी संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता वर्धा, नागपूर, वरोरा व चंद्रपूर येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

Chennai Floods : चेन्नईत इतिहासाची पुनरावृत्ती; 8 वर्षानंतर आजच्याच दिवशी शहरात पूर, जनजीवन विस्कळीत

त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार उमेश अनिल भोयर (रा. हेलोडी, ता. सेलू) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून वर्धा, नागपूर व चंद्रपूर येथील दुचाकी चाेरीचे गुन्हे उघडकीस करण्यात पाेलीसांनी यश आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनीष कांबळे, पवन पन्नासे, प्रदीप वाघ, शिवकुमार परदेशी व अखिल इंगळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply