Wardha : बांधकाम करताना विहीर खचली; मलब्याखाली दबून एकाचा मृत्यू, दोन मजूर जखमी

Wardha : शेतात विहिरीचे खोदकाम करण्यात आल्यानंतर वरच्या भागाला बांधकाम करण्यात येत आहे. हे बांधकाम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने मलब्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यातून एक सुखरूप बचावला असून ही घटना खरांगना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नटाळा बोथली येथे घडली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात अनेक शेतकरी शेतात विहीर खोदकाम करण्याचे काम करत असतात. तर खोदकाम पूर्ण झाल्यानंतर वरतून माती खचू नये यासाठी वरच्या भागापासून पक्के सिमेंटचे बांधकाम करण्यात येत असते. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील नटाळा येथील सतीश भोयर यांच्या शेतात खोदण्यात आलेल्या विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा काम केले जात असताना सदरची दुर्घटना घडली आहे.

एकाचा दबून मृत्यू

दरम्यान बांधकाम करण्यासाठी काही मजूर हे विहिरीत खाली उतरले होते. बांधकाम सुरु असताना अचानक विहीर खचली. विहीर खचताच तेथे मोठा आवाज आला. बाजूचे मजूर धावून आले व विहिरीत डोकावून बघितले असता मलब्याखाली काहीजण दबले गेल्याचे दिसून आले. त्यांना बाहेर काढण्यासाठी उतरले असता आदित्य ईश्वर मसराम (वय २४, रा. लादगड) याचा मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याचे दिसून आले.

दोन जण गंभीर जखमी, एक सुखरूप बाहेर

तसेच आदित्य याच्या सोबत असलेले मुकेश गणपत उईके (रा. अंभोरा) आणि सोमेश्वर देवीदास मलगाम (रा. लादगड) हे दोघे गंभीर जखमी झाले. यात उत्तम चंपत वरखडे हे सुखरूप बचावले. पोलिस पाटील यांनी घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना दिली. तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठविले. यावेळी घटनास्थळी मृत व जखमींच्या नातेवाइकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply