Pune : मद्यधुंद बसचालकाकडून वाकड पुलावर भीषण अपघात; कारचालक गंभीर जखमी

Pune : खासगी बसच्या मद्यधुंद चालकाने विरुद्ध दिशेने येत मोटार आणि रिक्षाला धडक दिली. यात कारचालक जखमी झाला. तर, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.४) मध्यरात्री हा अपघात वाकड पुलावर झाला.

या प्रकरणी अजय हंसराज जाधव (वय २४, रा. भोईरवाडी, माण फेज ३) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक संतोष अशोक काळे (वय ३६, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Vladimir Putin India Tour : ज्या विमानाने पुतिन भारतात दाखल झाले, त्यावर लिहिलेल्या ‘Poccия’ चा नेमका अर्थ काय?

याबाबत वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अजय जाधव हे कारमधून (एमएच १४-एलबी ७३१०) वाकड चौकातून हिंजवडीकडे जात होते. दरम्यान, समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या खासगी बसने (एमएच ०५-डीके ६३७७) त्यांच्या कार आणि रिक्षाला (एमएच १४-एचएम ७८८८) धडक दिली.

यात जाधव यांना जबर दुखापत झाली. यावेळी बसचालक मद्यधुंद असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे." दरम्यान, आरएमसी मिक्सर आणि अन्य बांधकाम साहित्य वाहणाऱ्या अवजड वाहनांपाठोपाठ खासगी बस चालकांचाही मुजोरपणा समोर येत आहे.

हिंजवडीत मद्यधुंद बसचालकाने तिघा भावंडांचा जीव घेतल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत; तोच याच भागात पुन्हा एका अपघाताची नोंद झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *