Wai Satara Maratha Morcha : सकल मराठा समाज वाई - सातारा पायी माेर्चा, आंदाेलकांना पाचवडनजीक पाेलिसांनी राेखले; प्रशासन-समन्वयकांची चर्चा सुरु

Wai Satara Maratha Morcha : मराठा समाजाच्या वतीने आज (मंगळवार) वाई शहर बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान वाई सातारा असा सकल मराठा समाजाने काढलेला पायी माेर्चा हा पाेलिस दलाने पाचवड येथे थांबविला. आंदाेलकांना साता-याकडे जाऊ नये असे आवाहन पाेलिसांनी केले.

जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज वाईहून साताऱ्याच्या दिशेने पायी चालत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यातील बांधकाम क्षेत्राच्या व्यवहारात ९० टक्क्यांनी वाढ; ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातील निष्कर्ष

या माेर्चाची सुरुवात आज सकाळी वाईतील ढाेल्या गणपती येथून झाली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाची सखोल चौकशी आणि मराठा आरक्षणाबाबत मराठ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करीत मोर्चा साता-याकडे मार्गक्रमण करत राहिला.

हा माेर्चा पाचवड फाट्यावर येताच पाेलिसांना आंदाेलकांना साता-याच्या दिशेने जाऊ नये असे आवाहन केले. यावेळी आंदाेलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास निघाल्याचे पाेलिस दलास सांगितले.

यावेळी पाचवड येथे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी मराठा समाजाच्या समन्वयकांशी चर्चा करुन साता-याकडे जाऊ नये आम्ही आपले निवदेन प्रशासनाकडे देऊ असे आश्वासन दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply