Wada Bhivandi Highway Blocked : काम होऊनही रस्ता जैसे थे; संतप्त नागरिकांचा वाडा भिवंडी राज्य महामार्गावर रास्ता रोको

Wada Bhivandi Highway Blocked : भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर खर्च करून दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामुळे अजूनही अपघात होत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील पीडब्ल्यूडीकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाडा- भिवंडी  राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

भिवंडी - वाडा- मनोर महामार्गावर झालेली निकृष्ट दर्जाची कामे आणि त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे झलेल्या  अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण अपंग झाले आहेत. या विरोधात अनेकदा आंदोलन करून देखील याची चौकशी होत नाही. म्हणून आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस नाक्यावरती स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आज भिवंडी - वाडा मनोर राज्य महामार्ग  रोखले. 

Weather Update News : तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे जनजीवन विस्कळीत; तर उत्तर भारतात बर्फवृष्टीने पारा घसरला

एसआयटी चौकशीची मागणी 

सदर रस्त्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील रस्ता आहे त्याच स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे या महामार्गावर २०१२ पासून ३५३ कोटी रुपये खर्च झाले. तर २०२१ नंतर ७० कोटी खर्च केल्याचे नमुद केल्याची नोंद बांधकाम विभागाच्या दप्तरी आहे. सदर ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आंदोलन कर्त्यानी केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply