Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणी चरणी १६ लाखाचा सोन्याचा हार अर्पण; विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले होताच ओघ सुरु

Vitthal Rukmini Mandir : तब्बल अडीच महिन्यानंतर विठ्ठल- रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. यामुळे पुरातन मंदिराचा लुक पाहण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. यासोबतच देणगी देखील वाढू लागली असून आज हवेली तालुक्यातील एका भाविकाने १५ लाख ९१ हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला अर्पण केले.

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील अडीच महिन्या पासून बंद होते. मात्र २ जूनपासून हे मंदिर नव्या रूपात भाविकांसाठी खुले केले आहे. मंदिराला ७०० वर्षाचे पुरातन रूप देण्यात आले आहे. मंदिराचे मूळ रूप पाहण्यासाठी देशभरातून भाविक पंढरीत येत आहेत.  दर्शनासाठी येणारे भाविक विठ्ठल चरणी देणगी देत असतात. आता भाविकांची गर्दी वाढल्याने विठ्ठलाच्या देणगीत देखील वाढ होऊ लागली आहे. 

Chandrashekhar Bavankule : सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी,चंद्रशेखर बावनकुळे यांची देवेंद्र फडणवीसांना विनंती

या दरम्यान आज हवेली तालुक्यातील देणगीदार बबन तुपे यांनी विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चरणी १५ लाख ९१ हजार किमतीचे दोन हार अर्पण केले. यावेळी बबन तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य  ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply