Virat Kohli : 'हा माझा शेवटचा वर्ल्डकप..' डोळ्यांत अश्रू, भावनांना बांध घालून विराटची मोठी घोषणा

Virat Kohli : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली, सामन्याचा सामनावीर ठरला आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने मोठी घोषणा केली आहे.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ' हा माझा शेवटचा वर्ल्डकप होता. मला हेच साध्य करायचं होतं. संघाला जेव्हा गरज होती. तेव्हा मी संघासाठी माझं काम पूर्ण केलं. ' यासह त्याने युवा खेळाडूंचाही उल्लेख केला. यापुढील टी -२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाईल असं विराट म्हणाला.

IND Vs SA, Final : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर फायनलमध्ये 7 धावांनी सनसनाटी विजय

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाला नवीन रोल देण्यात आला होता. यापूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. मात्र या स्पर्धेत त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आणि सुपर ८ फेरीतील सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. मात्र फायनलमध्ये त्याची जादू पाहायला मिळाली. फायनलमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना विराट कोहलीने अक्षर पटेलसोबत मिळून डाव सांभाळला. त्याने ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

विराट कोहलीच्या टी- २० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला १२५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४८.६९ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राइक रेटने ४१८८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३८ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply