Virat Kohli : पुणेकरांचे पैसे फिटले! बँटिंगआधी विराट बॉलिंगसाठी मैदानात

  Virat Kohli : विश्वचषकात 2023 भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सामन्यात कोहलीच्या फलंदाजीआधी चाहत्यांना त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. बांगलादेश विरुद्धच्या सामन्या हार्दिक पांड्याला दुखापत झाली, यामुळे तो मैदानाबाहेर गेला. यावेळी विराट कोहलीने गोलंदाजी केली. यामुळे चाहत्यांना अनेक वर्षांनंतर कोहलीची गोलंदाजी पाहता आली. यंदा विश्वचषक भारतात होत असल्याने आधीच चाहत्यांमद्ये प्रचंड उत्साह आहे. त्यातच पुण्यातील सामन्यादरम्यान 'किंग कोहली'ची गोलंदाजी पाहायला मिळाल्याने चाहतेही उत्साहात होते.

IND Vs PAK CWC 2023 : भारतासमोर पाकिस्तान झुकला! अवघ्या १९१ धावांवर पाडला खुर्दा

बांगलादेशने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान फलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. चेंडू अडवताना पांड्याला दुखापत झाली. यावेळी पांड्याला वेदना होत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर मैदानावर डॉक्टर आले, त्याला तपासलं. यानंतर पांड्याने पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेदना होत असल्याने त्याला षटकं पूर्ण करता आलं नाही. यानंतर कोहलीनं गोलंदाजी केली. विराटने पांड्याच्या षटकातील उरलेले तीन चेंडू टाकले. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply