Virar News : अर्नाळा समुद्रात बोट बुडाली, एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश

Virar News : विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ११ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमधून अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी आणि विटा वाहून नेण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक बोट बुडाली. या बोटीत एकूण १२ जण होते. त्यातील ११ जण सुरक्षित असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यापूर्वी अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. दुरूस्तीच्या कामासाठी एका बोटीतून विटा आणि रेती नेली जात होती. मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकला आणि वेगात असलेली ही बोटसमुद्रात बुडाली. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे ११ जणांचे प्राण वाचले. हे सर्वजण सुखरूप होऊन किनाऱ्यावर पोहोचले.

या बोट दुर्घटनेमध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष मुकने असं या व्यक्तीचे नाव असून त्याचा मृतदेह बऱ्याच तासांनंतर सापडला. अर्नाळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्नाळा पोलिसांनी कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर आणि खासगी बोटी मार्फत बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला. अखेर २४ तासांनी या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, उजनी जलाशयामध्ये प्रवासी बोट उलडून ६ जणांचा मृत्यू झाला होता. या बोटीतील प्रवासी हे करमाळ्यावरून इंदापूरला येत होते. पण अचानक वादळ आणि पावसामुळे ही बोट बुडाली. या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. पती-पत्नी आणि दोन लहान मुलं यांचा समावेश होता. तर दुसरीकडे अमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेली एसडीआरएफ जवानांची बोट नदीमध्ये बुडाली होती. या घटनेमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply