Virar Crime News : पहाटे साखर झोपेत असताना घरावर बेछूट गोळीबार; विरारमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Virar Crime News : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात इसमांनी एका व्यक्तीच्या घरावर गोळीबार केलाय. गोळीबार करून ते व्यक्ती तेथून फरार झालेत. गोळीबार नेमका का करण्यात आला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विरार पूर्व गोपचर पाडा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणारे मोबिन शेख यांच्या घरावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केली. त्यानंतर ते तेथून फरार झाले आहेत. ही फायरिंग आपआपसातील वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Bacchu Kadu : आमदार बच्चू कडू मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात होणार सहभागी

पहाटे 3 च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी काहीतरी मदतीच्या बहाण्याने मोबिन यांचे दार वाजविले. पण घरातून व्यक्ती बाहेर न आल्याने अज्ञातांनी या घरावरच बेछूट गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत होणतीही जीवितहानी झालेली नाही.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार पहाटेच्या सुमारास झाला. गोळीबार झाला तेव्हा महिला आणि त्यांना मुलगा घरामध्येच झोपले होते. घरात झोपलेले असाना बाहेरून अचानक गोळीबार झाला. गोळीबारात या घरातील खिडकीच्या काचा फुटल्यात.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply