Vilas Lande : अजित पवारांनी शिरूर लोकसभेत डावललं, नाराज विलास लांडे आढळरावांचा प्रचार करणार का?

Vilas Lande : अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी  शिवाजी आढळरावांची  वर्णी लावली, तेंव्हापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे जणू गायबच झालेत. मंचरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत आढाळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.  या कार्यक्रमालादेखील विलास लांडे दिसले नाहीत. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली.  2019 प्रमाणे यंदा ही लांडेंना डावलण्यात आल्यानं ते कमालीचे नाराज आहेत. पुढची भूमिका ही त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

एरवी लांडेंनी माध्यमांसमोर येऊन आपली आहे ती अगदी टोकाची ही भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे. पण गेल्या आठवड्यात शिरूर लोकसभेत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल, असा आदेश अजित पवारांनी दिला तेंव्हापासून मात्र लांडे माध्यमांना टाळतायेत. जणू ते गायबच झालेत, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालीये. यामुळं विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की नाही? अमोल कोल्हेंच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा, या शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार? याकडे शिरूर लोकसभेतील प्रत्येकाचं लक्ष लागून आहे.

Loksabha Election 2024 : भाजपचा बारामती, राज्यातही पराभव होणार ; आमदार रोहित पवार यांचा भोरमध्ये दावा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली होती. त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचा नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात होती. मात्र आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि अजित पवारांनी आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी आवाहन केलं. गेली 35 वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मी 2009 साली लोकसभा लढलो आहे. 2019 ला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आले. मी 10 वर्ष आमदार होतो, महापौरही होतो. त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे. माझी विनंती आहे की, आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी, असं विलास लांडे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांना डावलण्यात आलं आणि आयात उमेदवार घेऊन आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या मुळे विलास लांडे चांगलेच नाराज झाल्याचं दिसत आहे. लांडे माध्यमांना टाळतायेत. जणू ते गायबच झालेत, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विलास लांडे शरद पवार गटात जाणार का?, अशा चर्चा रंगत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply