Vijaystambh Sohala : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे - कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी एक जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यानिमित्त पुणे - नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते एक जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे - नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना या मार्गावरुन सोडण्यात येणार आहे, त्यामुळे अन्य वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

असा आहे वाहतुकीतील बदल

- पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण चौकातून हडपसर मार्गे पुढे जातील

- ही वाहने पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रस्ता पुढे जातील

- शिक्रापूर ते चाकण मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद असेल.

- नगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील.

- मुंबईकडून नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक ही वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे नगरकडे जातील. हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे नगरकडे जातील.

- विजयस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांना या मार्गावरुन सोडण्यात येणार आहे

- पार्किंग ठिकाणापासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीच्या बसची सोय

कार पार्किंग ठिकाणे

"आपले घर' शेजारील हनुमंत कंद यांचा प्लॉट, सातव यांचा प्लॉट, लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारील सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सोमवंशी ऍकेडमी समोर, खंडोबाचा माळ, तुळापूर रोड वाय पॉईन्ट, फुलगाव सैनिकी शाळा मैदान

दुचाकी पार्किंग

तुळापूर फाटा, संगमेश्वर हॉटेल मागे, टाटा मोटार्स शोरूमचे मोकळे मैदान व शेजारील मैदान, पेरणे पोलिस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गोशाळेजवळील प्लॉट



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply