Vijay Wadettiwar News : ललित पाटील प्रकरणावरुन विरोधक आक्रमक, 'हे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत रॅकेट...' वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

Vijay Wadettiwar News : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. अंतिम आठवड्यातील या सुनावणीत राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

त्याआधी आज (सोमवार, १८ डिसेंबर) ललित पाटील प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. ललित पाटील प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका मांडत सरकारवर हल्लाबोल केला.

Pune News : पुण्यात अंडी चोरल्याच्या संशयातून महिलेचा विनयभंग; कपडे उतरवण्यास भाग पाडलं, संतापजनक घटना!

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"राज्यात ड्रग्ज प्रकरणे उघडकीस येत आहेत. उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र होतोय. याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच याला सरकारमधील मंत्र्यांचा सपोर्ट आहे, म्हणूनच ललित पाटील सारख्यांना पळून जाण्यासाठी सपोर्ट केला जातो.." असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र सरकार पुरस्कृत रॅकेट..

तसेच "ड्रग्ज प्रकरणात गुजरातच्या  कनेक्शनमुळे गुजरात संरक्षण देण्याचे काम केलं जाते आहे. शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेले आहे .ललित पाटीलला  यावेळेस संरक्षण मिळाले हॉस्पिटलमधून पलाईन केले. त्यानंतर ती कारवाई झाली. हे सर्व सरकारचे ढोंग आहे. सरकार हे सर्व प्रकरण पाठीशी घालण्याचा प्रयत्न" करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

राज्य ड्रग्जच्या विळख्यात...

"हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्ज तरुणाईच्या विळख्यात घालणारं आहे. सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी हे सर्व अड्डे उद्धवस्त व्हावे यांना कारवाई करावी ही आमची मागणी आहे," असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply