Vidarbha Politics : विदर्भात 10 लोकसभा जागांसाठी भाजपाची जोरदार तयारी; महायुतीत कोणाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष

Vidarbha Politics : भाजप लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी राज्यातील ४८ जागा जिंकण्यासाठी आपली तयारी सुरू केलीय. विदर्भात १० जागांवर आपला गड मजबूत करण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळतंय.

मागील वेळी विदर्भात काँग्रेसला एकच खासदार निवडणून आणता आला. यंदा भाजप आपल्या चिन्हावर खासदार निवडणून आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गटाकडे सध्या कृपाल तुमाणे, आणि भावना गवळी या दोन जागा विदर्भात आहे.

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनने खळबळ, ठाणे पोलिसांची पळापळ

कोणाला किती जागा

भाजप  महायुतीत अजित पवार गटाला एकच जागा सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाकडे  दोन जागा आहेत. शिंदे गटासाठी अजून किती जागा सोडतात, याकडेही लक्ष लागलं आहे.

मागील वेळी राष्ट्रवादीला भंडारा, गोंदिया, अमरावती आणि बुलढाणा अशा तीन जागा दिल्या होत्या. यंदा मात्र धर्मराव बाबा हे गडचिरोली जिल्ह्यातून लढण्यास इच्छुक आहेत. प्रफुल पटेलांनी सुद्धा आपण भंडारा गोंदियातुन लढण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलंय. तेच नवणीत राणा या सुद्धा यंदा अजित पवार यांच्याकडून लढतात, की भाजप त्यांना उमेदवारी देणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं  नाही.

सर्वच मतदार संघात समांतर तयारी

त्यामुळे यंदा भाजप आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सर्वच मतदार संघात समांतर तयारी करत आहे. रामटेकची जागा शिंदे गटाकडे असली, तरी ती जागा सुद्धा भाजपच्या चिन्हावर लढली जावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा  आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा केलाय. महायुतीमध्ये रामटेक मतदार संघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील पुढचा खासदार हा कमळावरचा असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी सांगितलं. आमची तिथे ताकद असल्याचाही त्यांनी बोलून दाखवलं. मात्र, इथून कोणी लढायचे? याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेईल, असंही ते म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply