Vasant More : मागील आठवड्यात शरद पवार यांची भेट अन् आज वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी

Vasant More : कात्रज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत असल्याचं जाहीर केलं आहे. सहनशक्तीचा कडेलोट झाल्याची भावना व्यक्त करत स्वपक्षियांनी त्रास दिल्याचा आरोप त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात केला आहे.

माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असे म्हणत कुणीही पक्षसंघटना सोडू नका असंही आवाहन मोरेंनी राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

Borivali News : बोरिवलीत १६ व्या मजल्यावरून पडून तिघांचा मृत्यू; इमारतीचं बाधकाम सुरू असताना दुर्घटना

लोकांना आता मी नाटक करतोय का अशी शंका येऊ लागली आहे आणि यासाठी पुणे शहरातील कोअर कमिटी जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 'वारंवार एकनिष्ठतेवर संशय घेतला जात असेल, सांगूनही माझ्यावरच कारवाया होत असतील तर मी हतबल आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललो होतो. पण, पुण्यात लोकसभा लढण्यासाठी नकारात्मक वातावरण असून आपण लढू शकत नाही असा अहवाल पाठवले जात आहेत, असेही मोरे म्हणाले.

मागील आठवड्यात शरद पवार यांची भेट

मागील आठवड्यात कात्रज डेअरीच्या आरक्षित जागेसंदर्भातील मुद्दा पुढे करत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेंव्हापासूनच मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.

मोरे यांची कारकिर्द

  • शिवसैनिक, शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष अशी सेनेत पदे भूषविली

  • मनसेच्या स्थापनेनंतर पक्षासोबत

  • २००७ मध्ये पहिल्यांदा महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड

  • २०१२ मध्ये पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

  • २०१२ ते २०१४ मनसे गटनेतेपदी निवड

  • २०१४ मध्ये दुसऱ्यांदा नगरसेवकपदी निवड

  • २०१७ मध्ये तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवड

  • २०१८ मध्ये मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी निवड

  • २०२१ मध्ये पुणे मनसे शहराध्यक्षपदाचा कार्यभार

  • २०१७ - २०२१ मनसेच्या गटनेतेपदी पुन्हा निवड

  • २०२४ मध्ये नाराजीनाट्यानंतर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply