Varanasi Cricket Stadium : वाराणसी होणार शिवमय; PM मोदींनी केलं क्रिकेट स्टेडियमचं भूमीपुजन, कार्यक्रमाला दिग्गज मंडळीची हजेरी

Varanasi Cricket Stadium : वाराणसीत भव्यदिव्य आणि आकर्षक असं स्टेडियम बांधण्यात येणार आहे. शनिवारी या स्टेडियमचा भुमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'स्टेडियन बनवल्याने स्थानिक लोकांचा मोठा फायदा होणार आहे. तसेच दुकानदार, टॅक्सी चालकांना देखील याचा फायदा होणार आहे.'

Lonavala Skywalk Project : लोणावळ्यातील लायन्स, टायगर पॉइंटचे रुपडं पालटणार, उभारण्यात येणार ग्लास स्कायवाॅक प्रकल्प

अनेक दिग्गजांनी लावली हजेरी..

वाराणसीत पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यात माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि सुनील गावसकरसारख्या दिग्गजांचा समावेश होता. तर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह देखील उपस्थित होते. 

हे स्टेडियम ३०.६ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये ३० हजार प्रेक्षकांना बसण्याची आसनव्यवस्था करण्यात येणार आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी तब्बल ३२५ कोटी इतका खर्च केला जाणार आहे.

या स्टेडियमपेक्षा वेगळं आणि हटके असण्यामागचं कारण म्हणजे, या स्टेडियममध्ये तुम्हाला काशीची संस्कृती पाहायला मिळणार आहे. या स्टेडियमचं छत हे भगवान शिवाच्या अर्धचंद्रासारखं तयार करण्यात येणार आहे.

तर स्टेडियममधील प्लड लाईट्स त्रिशूळासारखे आणि स्टेडियमचं डिजाईन हे बेलपात्रासारखी असणार आहे. या स्टेडियममध्ये खेळाडूंना सराव करण्यासाठी सात खेळपट्ट्या बांधण्यात येणार आहे. तर स्टेडियममध्ये कॉमेट्री बॉक्स, प्रेस गॅलरी अशा अनेक सुविधा असणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply