Vande Bharat Railway : खुशखबर! मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत ट्रेन; मुंबई ते संभाजीनगर, पुणे ते सिकंदराबाद मार्गावर धावणारखुशखबर! मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत ट्रेन; मुंबई ते संभाजीनगर, पुणे ते सिकंदराबाद मार्गावर धावणार

Vande Bharat Railway : मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद दरम्यान आता वंदे भारत ट्रेन धावणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मागितलेल्या सूचनेनंतर यासंदर्भातील मध्य रेल्वेने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेवर वंदे भारत ट्रेनची संख्या चारवरून सहावर पोहचणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा या दृष्टीने भारतीय रेल्वे मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरु केला आहे. वंदे भारत ट्रेन सारख्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे.

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळापासून रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात; रोजचं नियोजन कसं असेल?

प्रत्येक राज्यातून वंदे भारत चालविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. सध्या देशभरात ३५ वंदे भारत ट्रेनच्या ७० फेऱ्या होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या पाच वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.ज्यामध्ये एकट्या मध्य रेल्वेवर चार वंदे भारत धावत आहे.

ज्यामध्ये मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते मडगाव आणि नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावत आहे. आता आणखी दोन वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. ज्यामध्ये मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदरबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

मध्य रेल्वेने पाठविला प्रस्ताव

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य देशभरात ७५ वंदे भारत ट्रेन चालविण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. परंतु, आतापर्यत फक्त ३५ वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहे. तसेच वंदे भारत ट्रेनची निर्मिती जलद गतीने सुरु आहे. त्यामुळे आता भारतीय रेल्वेने सर्व झोनना पत्र पाठवून कोणत्या मार्गावर वंदे भारत चालविता येणार यासंदर्भात सूचना मागितल्या होत्या.

त्यावर मध्य रेल्वेने ३३१ किलोमीटर अंतराचे मुंबई ते संभाजीनगर आणि ५६२.९ किमी अंतराचा पुणे ते सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली आहे.

वंदे भारत ट्रेनसाठी मार्ग मोकळा

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विद्युतीकरणाल भारतीय रेल्वेने वेग देण्यात आलेला आहे. काही महिन्यापूर्वीच मनमाड ते संभाजीनगर दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. त्यामूळे वंदे भारत ट्रेन धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी जालना आणि औरंगाबाद जाणाऱ्या गाड्याना मनमाड येथे डिझल इंजिन जोडावे लागत होते. मात्र, आता विद्युतीकरण पूर्ण झाल्याने रेल्वेची अडचण दूर झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply