Odisha Train Accident : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा रद्द; ओडिशा अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Vande Bharat Inauguration Cancelled: ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.या अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. 

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज (3 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते.

तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे वंदेभारत एक्सप्रेसचं स्वागत करणार होते. या एक्सप्रेसच्या उद्घाटनाची मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आली होती. पण ओडिशामध्ये  झालेल्या रेल्वे अपघातामुळे आज होणार वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान, पुन्हा कधी हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

PM मोदींनी व्यक्त केले दुःख

ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं आहे.ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले कील, 'ओदिशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे.' 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply