Nagpur : नागपूर वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात मोठी अपडेट ; रेल्वेने नेमका कोणता निर्णय घेतला?

Nagpur :  नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. सोमवारपासून (२४ नोव्हेंबर) ही ट्रेन १६ डब्यांसह धावणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसने डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. १६ डब्ब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसमधून आता ११२८ जण प्रवास करतील. याआधी ही संख्या ५३० इतकी होती. रेल्वेच्या या निर्णायामुळे आता नागपूर-इंदौर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसमधून दररोज अतिरिक्त ६०० प्रवाशांना आरामात प्रवास करण्याची संधी मिळेल. या बदलामुळे सण आणि गर्दीच्या वेळी आराम मिळेल.

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.

२ वातानुकुलीत एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेयर कार्स वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असतील. सोमवारपासून इंदौर आणि नागपूर दोन्ही ठिकाणांहून सुटणाऱ्या गाड्यासाठी ही सुविधा लागू होणार आहे. उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोच संख्या वाढल्यामुळे आसनक्षमतेत मोठी वाढ होईल, प्रतीक्षा यादी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

वंदे भारत एक्सप्रेस इंदौरहून सकाळी ०६:१० वाजता निघेल आणि उज्जैनला ०६:५० वाजता, भोपाळला ०९:१० वाजता, नर्मदापुरमला १०:२२ वाजता, इटारसीला १०:४५ वाजता, बैतुलला ११:५८ वाजता आणि नागपूरला ०२:३५ वाजता पोहोचेल.

वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून ०३:२० वाजता निघेल. ती बैतुलला ०५:२३ वाजता, इटारसीला ०७:०० वाजता, नर्मदापुरमला ०७:२२ वाजता, भोपाळला ०८:३८ वाजता, उज्जैनला १०:४० वाजता आणि इंदौरला ११:५० वाजता पोहोचेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *