Vaishnavi Hagawane : 'माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय', वैष्णवी हगवणेच्या दिराचा VIDEO समोर, नागरिकांमध्ये संताप

Vaishnavi Hagawane : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीच्या नवऱ्यासह ५ जण अटकेत आहेत. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच या प्रकरणातला आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाप लेकाची दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत सुशील हगवणे काळ्या रंगाच्या घोड्यावर बसलेला दिसतोय. त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणे देखील दिसत आहेत. दोघांनीही एकसारखी ड्रेसिंग केली आहे. सुशील या घोड्यावर रूबाबामध्ये बसलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, 'लोकं मला म्हणतात बापाच्या जीवावर हवा करतो. च्या आईला बाप माझाच. मी हवा करेल नाही तर काहीपण करेल. तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा!'

Mumbai APMC Market : मुंबई एपीएमसीत तीन दिवसापासून भाजीपाला पडून; मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी, व्यापारी अडचणीत

सुशील हगवणेचे एकएक कारनामे आता समोर येत आहेत. सुशील देखील वैष्णवीला मारहाण करत होता. त्याच्यावर देखील अनेक गंभीर आरोप आहेत. सुशीलची एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी त्याने इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, 'यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया....सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया.... एक मत सुनेसाठी' सुशीलच्या या पोस्टवर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

वैष्णवी हगवणेनेचा हुंड्यासाठी छळ होत होता. तिला शारीरिक आणि मासिक त्रास दिला जात होता. सतत मारहाण केली जात होती. याच त्रासाला कंटाळून १६ मे रोजी तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात १७ मे रोजी तिचा नवरा, सासू-सासरे, नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर तपासात आणखी पाच आरोपींची नावे समोर आली असून त्यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply