Vaishnavi Hagawane : हुंडाबळी घेणाऱ्या राजेंद्र हगवणेला बेड्या, वैष्णवीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ?


Vaishnavi Hagawane : हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पुण्यात वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. या प्रकरणी फरार असलेले तिचे सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणात वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद यांना आधीच अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींनी वैष्णवीला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला होता. त्यामुळेच वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या फरार सासरा आणि दिराला अटक केल्यानंतर तिच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आरोपींना सोडू नका, त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचसोबत, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटेंनी संतप्त प्रतिक्रिया देत सांगितले की, 'पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात विलंब केला. काल पोलिस प्रशासनाने अजितदादांच्या आदेशानुसार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि मीडियाच्या माध्यमातून प्रकरण उचलून दिले. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी आदेश दिले होते की, १२ तासांच्या आत आरोपींना अटक करा. आरोपींना मागच्यावेळी जशी व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाली तशी यावेळी मिळू नये अशी माझी विनंती आहे.'

Accident News : भरधाव रेतीच्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

आनंद कस्पटेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले की,'आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांना मोका कायद्यांतर्गत शिक्षा द्यावी कारण यापुढे अशा काही घटना कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाहीत. सध्या मी माझ्या लेकीच्या दुखात आहे त्यामुळे वैष्णवीची जाऊबाई मयुरी जगतापने काय स्टेटमेंट दिले हे मी पाहिले नाही. पण वैष्णवीचे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावी ही विनंती आहे.'

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आज यश आले आहे. या दोन्ही आरोपींना या घटनेच्या ७ व्या दिवशी अटक करण्यात आली. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आज अखेर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply