Vaishnavi Hagawane : प्रकरणातील फरार आरोपी 'राजेंद्र हगवणे' कोण आहेत?

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा दावा वैष्णवीच्या आईवडिलांनी केला आहे. या प्रकरणात राजेंद्र हगवणे हे नाव चर्चेत आहे.

१६ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टममध्ये वैष्णवीचा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासाने झाल्याची माहिती समोर आली आहे. तिच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. यावरुन वैष्णवीला मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक केली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत.

Latur Crime : लॉजवर सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; छापा टाकत पोलिसांची कारवाई, सात जण ताब्यात

कोण आहेत राजेंद्र हगवणे?

राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पुण्याच्या मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते. वैष्णवी मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे. वैष्णवीचा मृत्यू हुंड्यापायी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनेकडून, तिच्या माहेरच्यांकडून हुंडा घेणे; अधिकच्या पैशांची, संपत्तीची मागणी करणे; त्यासाठी तिचा शारीरीक आणि मानसिक छळ करणे, एका प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरुन राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार) हकालपट्टी करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, मुलगी, दोन्ही मुलगे अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शोध सुरु आहे. बाकी तिघांना अटक करण्यात आली आहे. शशांक आणि वैष्णवी यांचे बाळ वैष्णवीच्या माहेरच्यांकडे सोपवण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply