Vaishnavi Hagawane : याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, वैष्णवी हगवणे प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vaishnavi Hagawane  : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही.', असं अजित पवार यांनी सांगितले. तसंच, या प्रकरणासंदर्भात ते लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. या प्रकरणी वैष्णवीच्या कुटुंबीयांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंबाला अजित पवार यांच्याकडून पाठिंबा मिळत असल्याचा दावा कस्पटे कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर या प्रकरणावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर सहाव्या दिवशी पहिली प्रतिक्रिया दिली. 'मी यासंदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. या प्रकरणाशी माझा संबंध नाही.' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी बारामतीमध्ये दिली. अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती विमानतळ दाखल होताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली.

Sambhajinagar Crime : संभाजीनगरात सशस्त्र दरोडा; गळ्याला चाकू लावून दागिने लुटले

वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या छळाला आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. १६ मे रोजी तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर तिच्या आई-वडिलांनी वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैष्णवीने शशांक हगवणेसोबत लव्ह मॅरेज केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी तिचा वारंवार छळ होत होता. तिला सतत मारहाण केली जात होती. याच त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply