Vaishnavi Hagavane : वैष्णवी प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार

Vaishnavi Hagavane : मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण आज पुणे पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चव्हाणच्या घरावर छापा टाकत काही वस्तू ताब्यात घेतले. तसेच निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना वारजे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आता तो स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. सासरा, सासू, पती, नणंद आणि दीर, हगवणे कुटुंबातील पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, सहावा आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

निलेश चव्हाण फरार असून, पोलीस त्याच्या शोधात आहे. पोलिसांनी आरोपी निलेशच्या घरावर छापा टाकत त्याचा लॅपटॉप यासह काही वस्तू जप्त केल्या आहेत. तर, वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याचे हगवणे कुटुंबाशी संबंध कसे होते? त्यांची ओळख कधीपासून आहे? याचा तपास सुरू आहे.

Sangli : अचानक तोल गेला अन् नदीच्या पुलावरून पडला, तरूणाचा दुर्देवी मृत्यू

वैष्णवी हगवणेच्या निधनानंतर तिचे बाळ निलेश चव्हाणकडे कोणाच्या माध्यमातून देण्यात आले? चव्हाणकडे ते किती काळ होते आणि त्याने ते पुढे कोणाकडे दिले? याचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहार झाले होते का? याचा तपास केला जात आहे.

कस्पटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी चव्हाणकडे गेले असता, त्याने बंदुकीचा धाक दाखवला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply