Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या

Vaibhavwadi (Sindhudurg) : रात्री दारू पिऊन सोबत जेवण केले. जेवण झाल्यानंतर काहीजण झोपले. मात्र गप्पा मारत चेष्टामस्करी करताना क्षुल्लक कारणातून एकाने सोबत असलेल्या दोघांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. सदरची धक्कादायक घटना वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे कुंभजाई माळानजीक हि घटना ३० एप्रिलला रात्रीच्या सुमारास घडली. धनेश्वर सत्यनारायण चोधरी (वय ६६) आणि मनोज सिंग (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. तर संजय बाबुराव लोखंडे (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. हरेश जनक यांच्या नवीन क्रशर जोडणीचे काम सुरु आहे. सदरचे काम नाशिक येथील एपीसी इंजिनिअरींग कंपनी करीत आहे. मुकादम सह परजिल्ह्यातील सात कामगार या ठिकाणी कामाला आहेत. दरम्यान बुधवारी अक्षयतृतीया असल्यामुळे काम करून काही कामगार दुपारनंतर वैभववाडी बाजारपेठत दारू पिण्यासाठी गेले. दारू पिल्यानंतर सोबत न आलेल्यासाठी ते दारू घेऊन नाधवडे येथे गेले.

अन्य कामगार झोपले

यानंतर रात्री सर्वानी एकत्र दारू पिऊन सोबत जेवण केले. त्यानंतर काही कामगार झोपण्यासाठी गेले. मात्र संजय लोखंडे व धनेश्वर चौधरी हे दोघे दारूच्या नशेत बसले असताना एकमेकांची चेष्टामस्करी करीत होते. याचवेळी संतोष यादव त्यांच्या रूममध्ये झोपायला गेला. त्यातील विजय जयस्वाल हा मोबाईल घेऊन खोलीच्या बाहेर झोपला होता. यावेळी मनोज सिंग व संजय लोखंडे हे मस्करी करीत खोलीच्या समोर अंधाराच्या दिशेने निघून गेले होते. याच दरम्यान जयस्वाल यांना झोप लागली.

 


चेष्ठामस्करीत झालेल्या वादातून भयानक कृत्य

दरम्यान संजय लोखंडे हा धनेश्वर चौधरी याच्या पोटावर बसून त्याला चाकू सारख्या धारदार हत्याराने छातीवर वार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याने अन्य कामगारांना जागे करून संजय लोखंडे याला बाजूच्या खोलीत बंद करून ठेवले. यावेळी त्यांनी मनोज सिंगचा शोध घेतला असता काही अंतरावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यनानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply