Vaibhav Naik : वैभव नाईकांच्या अडचणीत वाढ, पत्नीला एसीबीची नोटीस


 

Vaibhav Naik : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नाईकांसह त्यांच्या पत्नीला म्हणजेच स्नेहा वैभव नाईक यांनाही रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे. ११ फेब्रुवारीला कागदपत्रांसह स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीसीमध्ये वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी ११ फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या आधी देखील वैभव नाईक यांच्या मालमत्ता प्रकरणी चौकशी झाली होती. मात्र, आता वैभव नाईक यांच्या पत्नीची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांचे एचयुएफ व नाईक स्टोन इंडस्ट्रीजचे १ जानेवारी २००२ ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीतील उत्पन्न, मालमत्ता, खर्च याबाबातची माहिती देण्यास सांगितले आहे. नोटीसीमध्ये चौकशीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहण्याते आदेश देण्यात आले आहे.

CIDCO : सिडकोच्या घराला नागरिकांची नापसंतीच, किंमती कमी होणार का?

तसेच या कालावधीत आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेड्युल बॅलन्सशीट, प्रॉफिट अॅन्ड लॉल अकाऊंट डिटेल्स व त्यासंबंधीत कागदपत्रांसह ११ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी नोटीसीद्वारे दिले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस जारी केल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या पूर्वीही आम्ही सहकार्य केलं होतं. यापुढे देखील करू. दबाव टाकला तरी दबणार नाही. पक्षात येण्यासाठी कोणाकडून ऑफर नाही मात्र जरी आल्या तरी स्वीकारणार नाही. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि निष्ठावंत म्हणून राहीन', असं वैभव नाईक म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply