Vadapav Price : मुंबईचा वडापाव महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार

 

Vadapav Price : सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या २४ डिसेंबरपासून वडापाव महाग होणार आहे. मुंबईत आल्यावर कोणीही उपाशीपोटी झोपत नाही. याचे कारण म्हणजे वडापाव. अनेक लोक वडापाव खाऊन आपला दिवस काढतात. परंतु आता हा वडापाव महाग होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

२४ डिसेंबरपासून पावाचे भाव वाढण्याचा निर्णय बदलापूर बेकरी असोसिएशन घेतला आहे.तेल कांद्यापाठेपाठ आता पावही महागले आहेत. त्यामुळे वडापाव १ ते २ रुपयांनी महाग होऊ शकतो, अशी माहिती वडापाव विक्रेत्यांनी दिली आहे.

Pune Accident : पुण्यात मध्यरात्री थरार! भरधाव डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

बदलापुरमध्ये पावाच्या एका लादीमागे ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. कुळगाव-बदलापूर बेकरी असोसिएशनतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीच तेल, कांदा आणि बटाटा महाग झाला आहे. त्याचसोबत किराणामालाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात वडापाव विकणे परवडत नाही. या कारणाने आम्हाला वडापावच्या दरात १ ते २ रुपयांनी वाढ करावी लागू शकते, असं वडापाव विक्रेत्यांचं म्हणणं आहे. सध्या वडापावसाठी १५ रुपये मोजावे लागत आहेत. तर येत्या काळात एका वडापावसाठी १६ ते १७ रुपये मोजावे लागू शकतात.

सध्या बाजारात कांदे ७५-८३ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. कांद्याच्या किंमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहेत. त्यातच आता वडापावच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना अजूनच त्रास सहन करावा लागणार आहे. अशातच तेलाच्या किंमतीही वाढत आहेत. त्यामुळे वडापाव महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply