Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफूटी! मृतांचा आकडा १७ वर, ९ हजार भाविकांना रेस्क्यू करण्यात यश

Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीतील (Uttarakhand Cloudburst) मृतांची संख्या वाढत चालली आहे. या ढगफुटीमुळे मृतांचा आकडा १७ वर पोहचला आहे. शनिवारी रुद्रप्रयागमधून आणखी एक मृतदेह सापडला. मुसळधार पावसामुळे बाधित केदारनाथ मंदिराच्या पदपथावर अडकलेल्या ९००० हून अधिक भाविकांची सुटका करण्यात आली आहे.

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये ४ दिवसांपूर्वी ढगफुटी झाली होती. या घटनेनंतर एनडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन जारी केले होते. बचावकार्याचा आज चौथा दिवस असून त्यापैकी ११०० लोकांना वाचवण्यात यश आले असून ६०० जण अजूनही अडकल्याची भीती आहे. एअरलिफ्टसाठी चार हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर लिंचोलीजवळ थारू कॅम्प येथे सकाळी बचावकार्य करताना एक मृतदेह आढळून आला.

Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

३१ जुलै रोजी लिंचोलीजवळ जंगलचट्टी येथे ढगफुटीमुळे केदारनाथ ट्रेक मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. गौरीकुंड-केदारनाथ ट्रेक मार्गावर भिंबळीच्या पुढे रस्ता २०-२५ मीटर पाण्यात वाहून गेल्याने यात्रेकरू अडकून पडले होते. मंदाकिनी नदीचे पाणी आता ओसरले आहे. गुरुवारी बचावकार्य सुरू झाल्यानंतर केदारनाथ, गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरातून १००० हून अधिक यात्रेकरू अद्याप सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामानात सुधारणा झाल्यास रविवारी उर्वरित सर्व यात्रेकरूंची सुटका होऊ शकते. ८ ऑगस्टपर्यंत उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अडकलेल्या यात्रेकरूंना अन्न, पाणी आणि निवारा देण्यासाठी ८८२ मदत कर्मचारी २४ तास काम करत होते आणि त्यांच्या सुटकेच्या प्रयत्नांना मदत करत होते. उर्वरित यात्रेकरूंना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर भूस्खलनग्रस्त भागांपैकी एक असलेल्या सोनप्रयाग येथे तात्पुरता पूल बांधत आहे.

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply