Uruli kanchan : चार हजार लिटर गावठी दारू जप्त, उरुळी कांचन पोलिसांची कारवाई

Uruli Kanchan : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कंझार भट परिसरातील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांनी कारवाई करून तब्बल ३ चार हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेत दारू बनविण्याचे कच्चे रसायन, साहित्य जप्त केले आहे. कांतीलाल जवार राठोड, (वय ३४), रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे गावातील एका शेतामध्ये गावठी दारूची भट्टी असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सदर शेतामध्ये छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी भट्टीचालक राठोड याला ताब्यात घेत चार हजार लिटर दारू असलेली ११२ कॅन जप्त केले. तसेच हातभट्टी बनवण्याची साधने जागीच नष्ट केली.

Pune Weather Update : पुणे जिल्ह्यात उकाडा वाढला अनेक ठिकाणी पारा ४० शी पार

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड) स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पडुळे, सहाय्यक फौजदार उमेश जगताप, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस हवालदार शशिकांत खाडे, पोलीस हवालदार होळकर, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, पोलीस शिपाई अक्षय कामटे, पोलीस शिपाई अमोल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस हवालदार घाडगे, पोलीस हवालदार भुजबळ यांच्या पथकाने केली.

मागील एक महिन्यात उरुळी कांचन पोलिसांनी याच शेतातील एका दारूच्या अड्ड्यावर कारवाई केली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जागेच्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. जागेचा मालक आपला या दारुशी व भट्टीशी काहीही संबंध नसल्याचे सांगत होता. सदर जागामालक जेलमध्ये असतानाही शेतामध्ये गावठी दारूची भट्टी चालवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये त्यांना कल्पना न देता चोरट्या स्वरुपात उसाच्या शेतामध्ये दारूच्या भट्ट्या चालवल्या जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply