Unseasonal Rain: मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाचं धुडगूस; शेतकरी मोर्चालाही पावसाचा फटका, शेतकऱ्यांची आडोशासाठी धावपळ

Unseasonal Rain News : मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. आज सकाळपासूनच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. संध्याकाळी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

विजांच्या कडकडाटासह अचानक सुरु झालेल्या पावसाने मात्र घरी निघालेल्या चाकरमान्यांची चांगली तारांबळ उडाली. काही ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाचा फटका शेतकरी मोर्चाला देखील बसला.

शेतकरी मोर्चा आज वाशिंद येथे मुक्कामी आहे. मात्र वाशिंदमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांचा मुक्काम मोकळ्या मैदानावर असल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. शेतकऱ्यांनी झाड, गाडी मिळेल तिथे आडोसा घेतला. पावसात भिजत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहे.

हजारो शेतकऱ्यांसाठी एकाच जागी व्यवस्था करण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास तयार होणार का? हा प्रशासनासमोरची अडचण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply