Unseasonal Rain : वारे व पावसामुळे कोथरूड मध्ये अनाधिकृत फ्लेक्स पडले; नागरिकांची तारांबळ

कोथरूड : कोथरूड मध्ये वारे व पावसामुळे दोन ठिकाणी फ्लेक्स व तीन ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. वाहतुक कोंडी होवून वाहनचालकांची तारांबळ उडाली.

कोथरुड डेपो जवळ बसवर तसेच गुजरात काॅलनी चौकात फ्लेक्स पडला. शास्ञीनगर चौक येथे रिक्षावर झाड पडले. एआरए रस्त्यावर एक झाड पडले. कर्वेरस्त्यावरील सक्सेस स्क्वेअर सोसायटीमध्ये अर्धवट छाटणी झालेल्या फांद्या पडून वाहनांचे नुकसान झाले. वृक्ष प्राधिकरणच्या कामाबद्दल सोसायटीतील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. पौड रोडवरील आनंदनगर येथे पावसामुळे पाणी साठले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *