Unseasonal Rain Hits Marathwada : अवकाळीचा मराठवाड्यातील 976 गावांना फटका;9 हजार 210 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain Hits Marathwada : मराठवाड्यामध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळी पावसाा फटला सुमारे 976 गावांना बसला आहे. यामध्ये 17 हजार 687 शेतकऱ्यांचे जवळपास 9 हजार 210 हेक्टर वरील पिकांच नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे पंचनामे हे निवडणुकीच्या धामधूमित रखडले. आता मंडळनिहाय नुकसान भरपाईची माहिती राज्य आपत्ती निवारण विभागाने मागवली आहे. यामुळे आकड्यांची जुळवा जुळव करताना प्रशासनाला नाकी नऊ येत आहे.
 
एप्रिल महिन्यात मराठवाडा विभागातील अनेक भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामध्ये वीज कोसळून 25 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले. त्याशिवाय लहान मोठी 345 जनावर देखील दगावली. तसेच 725 हुन अधिक घरांची पडझड झाली होती. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply