Unseasonal Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत

Unseasonal Rain : भंडारा जिल्ह्यात आज सकाळी हलक्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली मागील २ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच आज सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू आहे. त्यामुळे भात पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे.

Rohit Pawar : घाबरु नका, आजही बाप माणूस माझ्या मागे उभा आहे, ED चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन!

राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. अशात राज्यात आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply