Unity in Diversity : ..अन् बाप्पाच्या मिरवणुकीचे ढोल ताशे काही क्षण बंद झाले

नाशिक : अनंत चतुर्थी आणि पवित्र शुक्रवार असे दोन्ही योग एकच दिवशी जुळून आले. त्याचे दर्शन गणेश विसर्जन मिरवणुकीत बघावयास मिळाले. अजान सुरू होताच शिवसेवा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल पथकाचे ढोल वाजवणे थांबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून दिले.

समाजात सध्या काही समाज विघाटक घटकांकडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात शहराच्या हिंदू मुस्लिम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मात्र ऐक्याचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला.

गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्थीचा दिवस आणि इस्लाममध्ये एक पवित्र दिवस म्हणून ओळखला जाणारा पवित्र शुक्रवार दोघांचा योग शुक्रवार(ता.९) अर्थात अनंत चतुर्थीला जुळून आला. एकीकडे अजानचे सूर आणि दुसरीकडे गणरायाचा जयघोष असे दोन्ही सूर एकाच वेळी ऐकण्याचा योग देखील हिंदू मुस्लिम बांधवांना अनुभवास मिळाला.

मिरवणुकीची विशेषता

गणेश विसर्जन मिरवणुकीची विशेषता म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून गणेश विसर्जन मिरवणूक मुस्लिम बहुल भागातून काढण्यात येते. हिंदू मुस्लिम दोन्ही समाज बांधव मिरवणुकीत सहभागी होत असतात. कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण होत नाही. दोन्ही समाज बांधव समाजस्यची भूमिका घेत धार्मिक सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत असतात.

शिवसेवा मित्र मंडळाचे कौतुक

आज बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मशिदीतून अजून सुरू झाली, त्यावेळी मिरवणुकीतील शिवसेना मित्र मंडळाने जागेवर ढोल वाजवणे बंद केले. अजान संपल्यानंतर पुन्हा दोनचा गजर सुरू झाला. शिवसेना मित्र मंडळाच्या या धार्मिक सामाजिक स्वरूपाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply