Ulhasnagar News : चूक नसतानाही दंड भरतोय दुचाकी मालक; उल्हासनगरातील अजब प्रकार, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

Ulhasnagar : वाहतुकीचे नियम मोडतोय एक जण आणि त्याचा दंड भरतोय दुसराच. असा प्रकार आता उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. वाहतूक विभागाचा दंड भरून मोटरसायकल चालक हैराण झाला असून त्याच्या तक्रारीकडे मात्र वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. 

उल्हासनगर कॅम्प २ मध्ये राकेश कारीरा नामक राहत असून त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी आहे. या गाडीला दंड लागल्याचे मेसेज कारीरा यांना दर महिन्याला येतात. मात्र दंडाच्या पावतीसोबत आलेला फोटो ओपन करून पाहिला असता त्याच नंबरची मरून रंगाची बर्गमॅन स्कुटर दिसते. त्यामुले कारीरा यांच्या गाडीचा नंबर लावून बर्गमॅन चालक गाडी चालवत असल्याचं समोर आले आहे. अर्थात हा धक्कादायक प्रकार काय आहे; हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. 

Uddhav Thackeray : 'ऑपरेशन टायगर' उद्धव ठाकरे रोखणार? डॅमेज कंट्रोलसाठी कोणता मेगा प्लान आखलाय? वाचा

काही दिवसांपूर्वी रिक्षाचा प्रकार आला समोर 

उल्हासनगर वाहतूक विभागाने काही दिवसांपूर्वी एकाच क्रमांकाच्या रिक्षा पकडून बनावट नंबर प्लेट लावणाऱ्यावर कारवाई केली होती. यामध्ये देखील वाहतुकीचे नियम मोडणारा वेगळाच आणि दंड भरण्याचे काम मूळ रिक्षा मालक करत असल्याचे समोर आहे होते. पण पुन्हा असाच प्रकार दुचाकीबाबत समोर आला आहे. आता कारीरा यांच्या तक्रारीची दखल मात्र पोलीस घेत नसल्यानं कारीरा त्रासले आहेत.

पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही 

दरम्यान कल्याण परिसरात गाडीला दंड लागत असून २०२२ पासून हा दंड मात्र कारीरा यांना भरावा लागत आहे. याबाबत त्यांनी वाहतूक पोलिसांकडे देखील तक्रार केली आहे. पण पोलिसांकडून योग्य सहकार्य आणि प्रतिसाद मिळत नसल्याची कारीरा यांची तक्रार आहे. यामुळे करीरा यांना आणखी किती दिवस असा दंड भरावा लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply