Ulhasnagar News : उपचारासाठी नेत असल्याचे सांगून ५ महिन्याच्या बालकाचे अपहरण; दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

Ulhasnagar News : गरीब कुटुंबातील पाच महिन्याच्या बालकाला उपचार करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगून बालकाचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर परराज्यात या मुलाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना उल्हासनगर पोलिसांनी  अटक केली आहे. तसेच अपहरण झालेल्या बालकाला पोलिसांनी आईच्या ताब्यात दिले आहे. 

उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील एका वस्तीमध्ये मीना सोनवणे आणि त्यांचा परिवार वास्तव्यास आहे. त्यांना पाच महिन्याचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा कार्तिक सुनील सोनवणे हा आजारी होता. मात्र उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्याला परिसरात राहणारे स्वाती बेहेरा या महिलेला सांगितले असता कार्तिकला मी बरे करते असे सांगून त्याला हैदराबादला चांगले हॉस्पिटल आहे. तेथे उपचार करेल तसेच  उपचारासाठी लागणारा २ लाखाचा खर्च देखील करणार असल्याचे सांगून मुलाला हैदराबाद येथे घेऊन गेले. 

Mumbai Hoarding Collapse : कुठे फेडणार हे पाप? भावेश भिडे-उद्धव ठाकरेंचा फोटो X पोस्ट करत भाजपचा सवाल

एक महिन्यानंतर तक्रार 

मात्र एक महिना उलटून देखील अजून कार्तिक बरा का झाला नाही, त्यामुळे संशय आल्याने कार्तिकची आई मीना सोनवणे यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कार्तिकचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर सदर बालक विकले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक पथक तयार करून माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने बिहारमधील बाखरपूर, भागलपूर या ठिकाणी जाऊन कार्तिकचा शोध घेतला. दोन महिलांना अटक करून कार्तिकला आपल्या ताब्यात घेऊन आणि बालकाला सुखरूप  उल्हासनगर येथे आणून पोलिसांनी आईच्या स्वाधीन केले,या प्रकरणी अधिक तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply