Ulhasnagar News : दारू पिऊन गाडी चालविणे पडले महागात; पाच जणांची कारागृहात रवानगी

Ulhasnagar News :  पोलिसांकडून सध्या वाहन तपासणी मोहीम जोरदार करण्यात आली आहे. यामध्ये उल्हासनगर शहरात पोलिसांना दारू पिऊन गाडी चालविणारे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून या अनुषंगाने उल्हासनगर शहरात वाहतूक पोलिसातर्फे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात वाहतूक विभागातर्फे  रोज नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया केल्या जात आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांवर  गेल्या तीन महिन्यात वाहतूक पोलिसांनी एकूण ७९ चालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी ही एक मोहीम सुरू केली असून या मोहिमेद्वारे रविवारी ड्रंक अँड ड्राईव्ह या केसमध्ये सात जणांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले.  

दोघांनी भरली दंडाची रक्कम 

दरम्यान सोमवारी या सात जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या मद्यपी चालकांना दहा हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा केली. तसेच सात पैकी फक्त दोन चालकांनी दहा हजार रुपये दंड भरला आणि ज्या चालकांनी दंडाची रक्कम नाही भरली नाही; त्यांची रवानगी उल्हासनगर न्यायालयाने कल्याण येथील आधारवाडी कारागृहात केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply