Ulhasnagar : पेट्रोलपंपावर हेराफेरी? १२० रुपयात दिलं जातं अर्धा लिटर पेट्रोल, ग्राहकाने उघड केला प्रकार

Ulhasnagar Petrol pump Fraud News : उल्हासनगरात पेट्रोल पंपावर दुचाकी वाहनचालकांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे. येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर १२० रूपयांचे पेट्रोल भरल्यानंतर गाडीत फक्त अर्धा लिटरच पेट्रोल येत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकाने पेट्रोल पंपावरील हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा मोठा स्कॅम असल्याचेही त्याने म्हटले आहे.

दररोज लाखो दुचाकीस्वार पेट्रोल भरतात, पण त्यांची फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव उल्हासनगरमध्ये उघड झाले आहे. कारण, उल्हासनगरात इंडियन ऑइलच्या पेट्रोलपंपावर एका ग्राहकाने १२० रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटर पेट्रोल निघालं. हा मोठा स्कॅम असल्याचा आरोप होतोय. उल्हासनगरात पेट्रोल पंपावर मोठी हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय.

Weather Update : चक्रीवादळ वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

उल्हासनगरच्या १७ सेक्शनकडून श्रीराम टॉकीजकडे जाताना हिराघाट भागात इंडियन ऑइलचा पेट्रोलपंप आहे. या पंपावर एक तरुण शनिवारी संध्याकाळी पेट्रोल भरण्यासाठी आला. त्याने १२० रुपयांचं पेट्रोल भरण्यास सांगितलं असता मीटर शून्यवरून थेट ६०-७० रुपयांवर गेल्याचं त्याला दिसलं. त्यामुळं त्याने गाडी तिथेच उभी करून मॅनेजरला पेट्रोल बाटलीत काढून दाखवायला सांगितलं. त्यानंतर एका मेकॅनिकने त्याच्या टाकीतलं संपूर्ण पेट्रोल काढलं असता ते फक्त अर्धा लिटरच भरलं. त्यामुळं पेट्रोल भरताना हेराफेरी झाल्याचा आरोप ग्राहकाने केला.

चोरी पकडली गेली हे समजल्यानंतर पेट्रोल पंपाच्या मालकाने या ग्राहकाकडे चूक कबूल करत हे प्रकरण वाढवू नका, असं म्हणत १ लिटर पेट्रोल मोफत देण्याची तयारी दर्शवली, मात्र ग्राहकाने पैसे देऊन पेट्रोल घेतलं. या सगळ्या प्रकाराचा संबंधित ग्राहकाने चित्रित केलेला व्हिडीओ समोर आला असून आता या पेट्रोलपंपावर कारवाईची मागणी केली जातेय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply