Ulhasnagar Crime : फेसबुकच्या मैत्रीतून साधली जवळीक; ब्लॅकमेल करून लग्न, नंतर घडले ते भयंकर

 

Ulhasnagar : एका तरुणीची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं. या मैत्रीदरम्यान तरुणाने दोघांच्या काही क्षणांचे फोटो आणि चित्रीकरण केले. यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी तरुणीला अक्षरशः सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पतीविरोधात बलात्काराचा तर सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाशी ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये चांगल्यापैकी मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या. याचा दरम्यान दोघांमधील काही क्षणांचे प्रियकराने मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि तो व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली.

Chinchani Village : दोनशे लोकवस्तीच्या गावात एक कोटीची उलाढाल; वर्षभरात चिंचणीला २५ हजार पर्यटक दाखल

ब्लॅकमेल करत केले लग्न

ब्लॅकमेल करत तिच्या मनाविरुद्ध तरुणाने लग्न केलं. मात्र लग्नानंतरही काही सुरळीत सुरु न ठेवता तरुणीचा छळ करण्यास सुरवात केली. तिला माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी पतीसह सासरच्यांनी छळायला सुरुवात केली. काही वेळा माहेरच्यांनी या मागण्या पूर्ण देखील केल्या. मात्र त्यामुळे सासरच्या मंडळींची हाव आणखीन वाढली. त्यातूनच अक्षरशः तिला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले होते. अखेर हा सगळा छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

कोर्टाच्या आदेशानंतर प[पोलिसात गुन्हा दाखल

मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे तिने न्यायालयात खासगी केस दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात बलात्कार, मारहाण आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेतला. तसेच तिच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून दुसरीकडे तरुणीने दाखवलेल्या या धाडसाचं कौतुक होतंय.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply