Ulhasnagar Crime : कार दारात लावल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण; उल्हासनगराच्या पंजाबी कॉलनीतील घटना

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये कार पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून घरात घुसून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प ३ येथील पंजाबी कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. कॉलनीतील प्रितपाल हरबखसिंग संधू हे पत्नी आणि दोन मुलांसह पंजाबी कॉलनीच्या गुरुद्वारा जवळ सेंट्रल पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतात. दरम्यान ११ जानेवारी रोजी प्रितपाल संधू हे कार्यक्रमाला गेले होते. यामुळे ते रात्री उशिराने कार घेऊन घरी परतले. रात्री उशिरा घराजवळ आल्यानंतर त्यांनी कार पार्क करून घरी येऊन झोपले.

Jalna Police : गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांचे बंदुक परवाने होणार रद्द; जालना पोलिसांची माहिती

गाडी काढता न आल्याने राग

मात्र प्रितपाल सिंग यांच्या कारमुळे शेजारी राहणाऱ्या कर्तार सिंह यांना त्यांची गाडी काढण्यात अडचण येत होती. याचा राग आल्याने कर्तार सिंह आणि त्यांच्या मुलाने प्रितपाल संधू त्यांच्या घरात जाऊन गोंधळ घातला. यावेळी वाद घालत करतार सिंग आणि त्यांच्या मुलाने प्रितपाल सिंग यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यात त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी हत्याराने जोरदार वार केले. यात ते जखमी झाले होते.

पोलिसात दिली तक्रार

जखमी झालेल्या प्रितपाल सिंग यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान प्रितपाल सिंग यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी करतारसिंग लबाना, भाऊ बलवंत सिंग लबाना आणि कुलदीप सिंग लबाना यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply