Ulhasnagar Crime : शासकीय ओळखपत्र घालून आलेले तोतया अधिकारी ताब्यात; दोन महिलांचा समावेश

Ulhasnagar : तोतया पोलीस बनून फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान सरकारी अधिकारी बोलून महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र गळ्यात घालून एका दुकानदाराकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या चार तोतया अधिकाऱ्यांना उल्हासनगर मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या टीमने अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील खरटमल चौकात राजु कुकरेजा यांचे किराणा स्टोअर दुकान आहे. राजू कुकरेजा यांच्या दुकानात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चार जण गळ्यात महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र घालुन दूकानात आले. त्यांनी आम्ही महाराष्ट्र शासनाकडुन आलो आहोत; असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या किराणा दुकानाची तपासणी करायची आहे; असे सांगत तपासणी करण्याचे नाटक केले.

Pavana River : पवना नदी पुन्हा फेसाळली, माशांचा मृत्यू; नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

दोन लाख रुपयांची केली मागणी

दुकानाची तपासणी करायचे सांगत तपासणी करायची नसल्यास आम्हाला दोन लाख रुपये द्या; असे बोलुन राजू कुकरेजा यांना धमकावले. मात्र आपल्या दुकानात आलेले अधिकारी हे खरे नसून तोतया असल्याचे राजु कुकरेजा यांना लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिली. यानंतर पोलीस पथक रवाना झाले.

दोघांना २० पर्यंत पोलीस कस्टडी

पोलीस उपनिरीक्षक प्रविण खंदारे यांच्या पथकाने दुकानात पोहचून या तोतया अधिकारी असलेल्या चौघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये वैभव महादेव बगाडे, संतोष पारकर, सुभदा विचारे, शिल्पा पालांडे यांचा समावेश आहे. यातील दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. तर दोन आरोपीना न्यायालयाने २० तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply